उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सोयाबीन हे जिल्हयातील प्रमुख पीक आहे.गतवर्षी सोयाबीन  पीक काढणीस आले असतानाच अवकाळी पाऊस झाल्यामुळे ते भिजून खराब झाले. त्यामुळे यंदा पेरणीसाठी सोयाबीनसह इतर पिकांचे बी-बियाणे व कृषी निविष्ठांची  कमतरता पडणार नाही  याची प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी  दिले.
येथील प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा वार्षिक नियोजन सभागृहात खरीप हंगाम पूर्व  2020 आढावा   बैठकीत पालकमंत्री शंकरराव गडाख मार्गदर्शन करत होते. 
या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले,आमदार सुजितसिंह ठाकुर,जि.प.उपाध्यक्ष धनजंय सावंत,कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, सहायक नियेाजन अधिकारी सोमनाथ रेडडी आदी उपस्थित  होते.
पुढे बोलताना पालकमंत्री गडाख म्हणाले की, गतवर्षी सोयाबीनचा प्रति हेक्टरी 1159 किलो उतारा मिळाला. यावर्षी देखील खरीपाची पेरणी 5 लाख 51 हजार 800 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित  आहे. त्यादृष्टीने या पेरणीसाठी लागणारी रासायनिक खते व इतर सर्व प्रकारचे बी- बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासन व कृषी विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. जिल्हयातील सर्व पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी बांधवानी सेद्रीय शेतीचा अधिकाधिक अवलंब करावा व कृषी पुरक व्यवसायामध्ये वाढ करण्याचे आवाहन केले.तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.व इतर कारणे सांगून टाळाटाळ करतात ही बाब योग्य नसून सहायक उपनिबंधक सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 
शेतकऱ्यांना जास्तीजास्त पीक कर्ज बँका मार्फत  उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिवांना मदत करण्यासाठी पावले उचलावित अशा  सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हयात विद्यूत जोडणी विना शेतकऱ्यांच्या पिकाना पाणी देता   येत नाही त्यासाठी विद्यूत वितरण कंपनीने संबंधित ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत रखडलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची सूचना पालकमंत्री् गडाख यांनी      केली.तसेच कृषी विभागाने जिल्हयात बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी क्वॉलिटी कंट्रोल इन्सपेक्टर यांच्या माध्यमातून भरारी पथके नेमून त्यास लगाम घालावा त्याबरोबच पेरणीसाठी बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी, आंतर पीक पध्दती  व मुलस्थानी जलसंधारण पध्दतीचा  जास्तीजास्त वापर शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी जनजागृती करावी व माती परीक्षण नमुने तपासणी अहवाल शेतकऱ्यांना दिल्यानंतर कृषी विभागने सागितलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन शेतकरी करतात का नाही ?  याकडेही कृषी विभागाने लक्ष पुरावावे असे त्यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हा परिषद परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर व उपस्थित लोकप्रतिनिधींनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना  बी-बियाणे, खते व पीक कर्ज वेळेत उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करण्याची मागणी केली.यावेळी जिल्हा कोरोनामुक्त केल्याबददल  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजरौशन तिलक,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनमंत वडगावे याच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून  प्रशासनास सहकार्य केल्याबद्यल उस्मानाबाद जिल्हावासियांचे पालकमंत्री गडाख यांनी  आभार मानले.  तसेच आपल्या राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत असून आपण काळजी घेणे आवश्यक आहे.लॉकडऊनच्या कालावधीमध्ये कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये प्रशासन दक्षता घेत आहे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.या बैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, डॉ. तानाजी चिमनशेटे,प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बजरंग मंगरूळकर यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी याच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 
Top