प्रहार शिक्षक संघटनेेच्या वतीने आ. बच्चू कडू यांना निवेदन  
परंडा / प्रतिनिधी -
प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू बीड दौ-यावर आले असता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे  त्यांना प्रहार शिक्षक संघटना, उस्मानाबादच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन नागपूर हिवाळी अधिवेशनात 2005 नंतरच्या सर्व कर्मचा-यांना जूनी पेन्शन लागू करावी या तारांकित प्रश्नासह शिक्षकांचे राज्य रोष्टर एकच करावे,राज्यातील दुर्गम शाळांची पुनर्रनिश्चिती करणे,7 व्या वेतन आयोगतील त्रुटी दुर करून राज्यातील इतर कर्मचा-यां प्रमाणे 10-20-30 ची आश्वासित योजना लागू करावी अशी आग्रही मागणी केली.
पाच वर्ष निवडून दिलेल्या आमदाराला मरेपर्यंत जूनी पेन्शन मिळते तर मग 20 -30 वर्षे सेवा करणा-यांना कर्मचा-यांना का नसावी या मागणी बाबत हिवाळी   अधिवेशनात आवाज उठवणार,असे आ. बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी प्रहारचे शिक्षक संघटनेचे   जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे, ििजल्हा संघटक दत्तात्रय पुरी , संतुक कडमपले, फिरोज शेख, योगेश चाळक, आपासाहेब सुरवसे यांंच्यासह प्रहारचे शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top