उस्मानाबाद/प्रतिनिधी-उमरगा येथे पंडित जवाहरलाल  नेहरु यांच्या  जयंती निमित्त पडोस युवा संसद कार्यक्रम संपन्न झाला. उमरगा येथील दिशा अकॅडमी स्पर्धा मार्गदर्शन केंद्रामध्ये नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व नेहरू  युवा केंद्र  संघटन स्थापना दिवसा निमित्ताने युवक व युवतींना पडोस युवा संसद कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास, युवा नेतृत्व, स्वच्छता, पर्यावरण कॅशलेश व्यवहार, शासकीय योजनांची माहिती आदी विषयावर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राम जाधव, तर प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार विलास तरंगे, तालुका कृषी अधिकारी सारिका लोकरे अंबुरे, बार असोसिएशनचेे  सचिव  सचिव अॅड. एस.पी.इनामदार,  उपजीविका व्यवस्थापक किशोर औरादे आदी मान्यवरांनी वरील विषयावर  युवकांना व युवतींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पद्माकर पाटील तर आभार प्राध्यापक अविनाश गुरव यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चैतन माने, अंजली नरसुरे, श्रीशैल स्वाम, विश्वनाथ प़ाढरकवठे, फिरोज अत्तार यांनी परिश्रम घेतले.

 
Top