उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरचे उद्घाटन होऊन 19 महिने उलटले परंतु अद्याप ट्रामा केअर सेंटर सुरू झालेले नाही. ट्रामा केअरसाठी असलेले तज्ञ डॉक्टर, नर्स व शिपाई असताना अधिका-यांचे इच्छाशक्ती अभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. हाडांचे स्कॅनिंग करण्यासाठी 35 लाख रुपयांची सिआर्म मशीन 19 महिन्यांपासून धुळखात पडुन आहे. दिड वर्षांत एकाही रुग्णांवर उपचार होत नसल्याने अपघात झालेल्या व आपात्कालीन रुग्णांना सोलापूर किंवा लातुरला पाठवले जात आहे.
उमरगा शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे ट्रामा केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणा-या अपघातांची संख्या वाढली आहे. ट्रॉमा केअर युनिटच्या माध्यमातुन अपघातांतील जखमीवर योग्य उपचार करणे यामुळे शक्य होणार आहे. ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीचे काम अडीच वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते. 19 महिन्यांपासुन हाडांचे स्कॅनिंग करण्यासाठी 35 लाख रुपयांची सिआर्म मशीनसह लाखो रुपयांची बहुतांश यंत्रसामुग्रीही उपलब्ध आहे. डॉक्टर्स, सिस्टर, वर्ग 4 चे कर्मचारी यांच्यासह वीस जणांची नियूक्ती झाली व युनिट प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठी प्रतीक्षा होती. 7 एप्रिल 2018 रोजी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी अनेक स्वप्न दाखवली होती. यानंतर तरी अपघातग्रस्त व्यक्तीला नुसती मलमपट्टी करून सोलापूर, लातूर किंवा खाजगी रुग्णालयात रेफर केले जाणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु 19 महिने उलटुनही ट्रामा केअर सेंटर सुरू केलेले नाही. एकही किचकट शस्त्रक्रिया न करता रुग्णांना रेफर करण्यातच धन्यता मानली जात आहे. लाखो रुपयांची मशनरी व आवश्यक असलेला तज्ञ डॉक्टर्स, नर्स, वर्ग 4 चे कर्मचारी, कॉट उपलब्ध असताना ट्रामा केअर सेंटर बंदच ठेवण्यात आले आहे. ट्रामा केअरच्या इमारतीमधील एका हॉलचा उपजिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमासाठी वापर केला जात आहे. उर्वरीत खोल्या बंदच आहेत. ट्रामा केअर सेंटर सुरुच करावयाचे नव्हते तर मशनरी का मागवली ? लाखो रुपयांची मशनरी धुळ खात पडून आहे. याला जबाबदार कोण ? ट्रामा केअर साठी उपलब्ध कर्मचारी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील का नाहीत ? पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले असताना सेंटर सुरू का होत नाही ? असे प्रश्न विचारले जात आहेत.