उस्मानाबाद /प्रतिनिधी-
नाशिक येथे होणाऱ्या सिनियर राज्यस्तरीय तलवारबारबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी दि.30 नोव्हेंबर 2019 रोजी होणार आहे. या निवडचाचणीतून उस्मानाबाद जिल्हा संघ निवड करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेच्या अधिपत्याखाली नाशिक जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने दि.13 ते 15 डिसेंबर 2019 दरम्यान होणाऱ्या 30 व्या सिनियर राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून या स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा संघ सहभागी होणार असून संघ निवडण्यासाठी निवडचाचणीचे आयोजन शनिवार दि. 30 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 4.00 वाजता जिल्हा स्टेडियम येथे करण्यात आले आहे.
निवडचाचणी करीता खेळाडूंना वयाची अट नाही. राज्यस्तरीय स्पर्धेतील संपूर्ण सामने इलेक्ट्रॉनिक्स अँपरेटस वर होणार असून यासाठी खेळाडूंनी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणणे अनिवार्य राहील. खेळाडूंनी आपली नावे 24 नोव्हेंबर 2019 पर्यंत नोंदवावीत. या तारखे नंतर येणा-या नावाचा विचार केला जाणार नाही. नाव नोंदविताना शालेय अभिलेखा प्रमाणे नाव, जन्म तारीख, पत्ता, फोन नंबर, शाळेचे नाव, इयत्ता, 4 पासपोर्ट साईज फोटो देणे आवश्यक आहे. वरील सर्व माहिती श्री.प्रमोद डोंगरे यांच्याकडे प्रत्यक्षात आणून द्यावी.
तरी जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन उस्मानाबाद जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव राजकुमार सोमवंशी ( शिवछत्रपती राज्य क्रक्रीडा पुरस्कार प्राप्त ) यांनी केले आहे.