रुईभर /प्रतिनिधी- शेतकरी बांधवांनी शेतीपुरक व्यवसाय करीत असताना त्याच्यामध्ये सातत्याने लक्षपूर्वक जोड व्यवसाय केल्यास हमखास शेतकऱ्यांना चांगले यश मिळू शकते असे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक रामदास कोळगे यांनी व्यक्त केले रुईभर येथे आयसीआयसीआय फाउंडेशनच्यावतीने ग्रामीण कौशल्य विकास अंतर्गत प्रमाणपत्र वाटप आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी रुईभरचे सरपंच दत्तात्रय कस्पटे फाऊंडेशनचे डेव्हलपमेंट ऑफिसर प्रदीप गागरे समन्वयक दत्तात्रय क्षीरसागर डॉ.वैभव हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती
          श्री कोळगे पुढे बोलताना म्हणाले की  दुग्ध व्यवसाय शेळीपालन व गांडूळ खत निर्मिती हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे उद्योग असून त्यावर प्रक्रिया उद्योग करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होवु शकतोआपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भारतातल्या शेतकऱ्यांचे 2022 पर्यंत  उत्पन्न दुप्पट झाले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून हे कौशल्य असलेल्या प्रशिक्षणाचा भाग समजावा असेही शेवटी कोळगे यांनी सांगितले यावेळी सरपंच दत्तात्रय कस्पटे प्रदीप गागरे दत्तात्रय क्षीरसागर डॉ.वैभव हिंगमिरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन   केले यावेळी शेतकऱ्यांना आयसी आयसीआय फाउंडेशनच्यावतीने दुग्ध व्यवसाय शेळीपालन गांडूळ खत निर्मिती इत्यादी विषया साठी पंधरा दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी  सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आभार राजेंद्र  भणगे यांनी मानले
 
Top