उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 इटरनेटच्या युगात प्रत्येक माणूस हा मोबाईलच्या अति वापरामुळे व्यस्त आहे. कुटुंबात, घरी असूनसुद्धा सोशल मिडियाच्या वापरामुळे तो स्वकीयापासुन मनाने दूर आहे,आपल्या स्वत: च्या मुलांकडे बघण्यासाठी पण मोबाईलच्या व्यसनामुळे पालकांकडे वेळ नाही. पालकांनी घरी आल्यावर मोबाईल न पहाता कुटुंबाला वेळ द्यावा,मुलांशी संवाद साधावा, कौतुकाची थाप पाठीवर मारावी, मैदानावर खेळायला घेऊन जावे, या अशा अनेक अपेक्षा (मागणी) व्यक्त करण्यासाठी चाईल्ड लाईन उस्मानाबाद व सह्याद्री इटरनँशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पालकांचे लक्ष वेधण्यासाठी शहरातून पदयात्रा काढली.
यावेळी बाल मजुरी बंद करा, भिक्षा नको शिक्षण द्या, आम्हाला वेळ द्या. 1098 है मेरे साथ, या मागणीचे फलक घेऊन घोषणा देत होते. यात्रेदरम्यान  उस्मानाबाद शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पदयात्रेतील सहभागी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया समोर जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी अशोक सावंत, मौलाना अब्दुल आजाद शिक्षण संस्थेचे हाफीजली मोद्दीन, ग्रीन समता क्लीन समताचे नानासाहेब घाडगे, यांनी आपले विचार व्यक्त केले. व या उपक्रमाचे कौतुक केले. सह्याद्री फाऊंडेशन्सच्या सचिव व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वसुधा दापके- देशमुख यांनी उपस्थितीतांचे आभार मानले. बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ ए.डी.कदम, सदस्य कैलास मोटे, विद्यार्थी युवा सेना जिल्हाध्यक्ष अजय धोंगडे, अविनाश हराळ, सुशांत वाघमारे, सत्यार्थ फाऊंडेशनचे पदाधिकारी, अंजूमन हेल्थकेअर सोसायटीचे फेरोज पल्ला, बिल गेट्स काँलेजचे प्राचार्य अर्शद रजवी, अवेरनेस ग्रुपचे इफ्तेकार पटेल, सह्याद्री स्कूलचे प्रशासकीय अधिकारी सतीश जाधव, स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.इंगळे म्याडम व स्कूल चे शिक्षक, कर्मचारी, यांच्यासह शहरातील पत्रकार, महिला, नागरिक यांनी  पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
 
Top