कळंब /प्रतिनिधी -
घराच्या छतावर कपडे वाळत टाकण्यासाठी गेलेल्या डिकसळ येथील युवकाचा घरावरून गेलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी महावितरणच्या संबंधित अधिका-याविरुध्द गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
डिकसळ येथे अनेक भागातील विद्युत पोलच्या तारा लोंबकळत आहे. बुधवारी गणेश मधुकर जाधव (28) दुपारी दीडच्या सुमारास दस-यातील कपडे वाळत टाकण्यासाठी घराच्या छतावर 33 केव्ही लाईनच्या तारेला कपड्यांचा स्पर्श झाल्यामुळे वीजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह ठेवून महावितरण विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, यासाठी कळंब पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला.नातेवाइकांचा पवित्रा रात्री उिशरापर्यंत कायम होता. महावितरणच्या चुकीमुळे काही महिन्यांपूर्वी खालिद शिकलकर यांचा जीव गेला. गणेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा-मुलगी,भाऊ असा परिवार आहे.