तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नरक चतुर्दशीच्या पवित्र पर्वावर बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी रविवारी (दि. 8 नोव्हेंबर) तुळजापूर येथे येऊन आई तुळजाभवानीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, तसेच राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर ओढवलेले दुष्काळाचे संकट दूर होऊन सुख-समृद्धी नांदावी, असे साकडे घातले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळजापूर शहराध्यक्ष अमर चोपदार, शिवाजी पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नरक चतुर्दशीच्या पावन पर्वावर बीडच्या आमदारांनी घेतलेले आई तुळजाभवानीचे दर्शन आणि केलेली प्रार्थना यावेळी चर्चेचा विषय ठरली.
