धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील गवळी समाजाच्या वतीने दीपावली पाडव्या दिवशी शतकानू शतकापासून चालत आलेले पशु व पशुपालक पूजन परंपरेनुसार, याही वर्षी गवळी समाजाच्यावतीने गवळी गल्लीतील बाल हनुमान गणेश मंडळ येथे समाजाच्या वतीने सगर पूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. 

दीपावली पाडव्याच्या निमित्ताने गेली अनेक वर्षापासून गवळी समाज सगर पूजा आयोजित केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये सर्व केवळ धार्मिक महत्त्व नसून त्यामागे सामाजिक एकता निसर्ग संवर्धन पशुधना प्रति कृतज्ञता आणि भारतीय संस्कृती जतन करण्याचा व्यापक संदेश घडला आहे. सगर उत्सव हा श्रद्धा परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. पशुपालक यांनी ढोल ताशा, बँड पथक, वाद्य वाजवून रेडा, म्हशी यांच्या आकर्षक सजवून सगर पूजेला आपल्या परिवारासह येतात. रेडा व म्हैस पशुपालक, काशिनाथ दिवटे,भीमाशंकर दहीहंडे कारभारी मंडळींच्या समोर सलाम करावयास लावली जातात. त्यानंतर सलाम करून घेणाऱ्यां पशुपालकांना टिळा लावून, पान सुपारी देऊन त्यांचा सन्मान केला जात होता. 

दरवर्षीप्रमाणे वाद्य ताफ्यासह व शोभेच्या दारूच्या आतषबाजीत मिरवणुकीने काळा मारुती येथे येऊन हनुमानाचे दर्शन घेऊन मिरवणूक विसर्जित केली. सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा. गजानन गवळी, नंदकुमार हुच्चे ,मनोज अंजीखाने, राजा खरवरे, दहीहंडे बंधू, दिवटे बंधू, पंगुडवाले, शंकर, राम मिसाळ, भरत मिसाळ, विठ्ठल आपुने, भालचंद्र हुच्चे आदींनी परिश्रम घेतले. 

 
Top