धाराशिव (प्रतिनिधी)- सातेफळ तालुका कळंब येथील ग्रामीण साहित्यिक एड दिलीप पं कांबळे यांनी गेली 40 वर्ष साहित्यिक ,सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक, क्षेत्रात समाज हितासाठी निस्वार्थीपणे केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन काव्यांगण साहित्य मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा आदर्श समाजसेवक पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार काव्यांगण मंचेचे संस्थापक अध्यक्ष विकास राठोड, यांनी जाहीर केला आहे
हा पुरस्कार वितरण सोहळा काव्यांगण मंच आयोजित काव्यांगण दीपोत्सव दुसऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलनात संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व्याख्याते सुभाष सोनवणे (अहिल्यानगर )संमेलनाचे उद्घघाटक प्रवीण स्वामी आमदार लोहारा उमरगा मतदार संघ, संमेलनाचे स्वागताध्यक्ष बी पी सिंग प्राचार्य पोतदार इंग्लिश स्कूल उमरगा यांचे उपस्थितीत. या संमेलनाचे प्रमुख अतिथी साहित्यिक, समाजसेवक, समाज विकास संस्था प्रमुख भूमिपुत्र वाघ, डॉक्टर संजय राठोड, सुवर्णाताई पवार (कवियत्री गीतकार) इचलकरंजी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी पोतदार इंग्लिश स्कूल उमरगा जिल्हा धाराशिव येथे होणार आहे. हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे साहित्यिक दिलीप कांबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे या पुरस्काराबद्दल, धाराशिव जिल्ह्यातील प्रा रवी सुरवसे ज्येष्ठ साहित्यिक प्रा राजा जगताप,विजय गायकवाड, तुकाराम गंगावणे, के व्ही सरवदे,जयराज खुणे,पंडित कांबळे,प्रभाकर बनसोडे, रमेश बोर्डेकर, एड विश्वजीत शिंदे,एड झीनत प्रधान,एड मंगेश गाजरे, एड अजित कांबळे, इत्यादी मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.
