धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील भीम नगर येथील रहिवासी राज्य परिवहन महामंडळ धाराशिव बस डेपो मध्ये चालक म्हणून कार्यरत असणारे बाबासाहेब महादेव भालेराव (वय 56 वर्ष) यांचे अल्प आजाराने राहत्या घरी शनिवार 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाले. रविवारी सकाळी 11 वाजता बौद्ध स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, असा परिवार आहे. परिचारक तेजस भालेराव यांचे ते वडील होत.

 
Top