तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे जागतिक शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक व शिक्षीका यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त के.टी.पाटील कॉलेज ऑफ फॉर्मसीचे प्रा.डॉ.ईम्रान मोमीन, जिल्हा परिषद केंद्रीय प्रशालेतील शिक्षीका सुनिता माने, जिल्हा परिषद स्पेशल प्रशालेतील सहशिक्षिका शारदाताई जगताप यांचा सत्कार तेरणा हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड, जिल्हा परिषद स्पेशल प्रशालेचे मुख्याध्यापक शिवलिंग हंकारे, डॉ.अयुब शेख, उमेद च्या गट प्रेरीका पूजाताई चव्हाण, उद्योजिका रोषणीताई कर्णावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरहरी बडवे यांनी केले तर आभार राहुल गायकवाड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरख माळी, सुनिल गायकवाड यांनी परीश्रम घेतले.


 
Top