धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पदवीधरांचे अनेक प्रश्न सक्षमपणे सोडवले.त्यांनी पदवीधरांच्या हिताची अनेक कामे केली मात्र याचा गवगवा न करता त्यांनी विश्वास व प्रामाणिकपणा दाखवून  पदवीधरांशी बांधील राहिले असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी केले.

 ते परांडा, भूम,वाशी च्या विविध शाळा व महाविद्यालयात आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ पदवीधर संवाद कार्यक्रमात बोलत होते. आ. काळे पुढे म्हणाले की सतीश चव्हाण यांनी दांडग्या संपर्काच्या माध्यमातून शासनाकडे सतत पाठपुरावा करून मराठवाड्यातील पदवीधर असणाऱ्या सर्व स्तरातील घटकांचा विकास केला. विधिमंडळातही त्यांनी आवाज उठून पदवीधरांशी बांधिल राहिले. येत्या शुक्रवारी 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पदवीधर मतदारांनी सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या नावासमोरील चौकोनात इंग्रजीत 1 क्रमांक टाकून प्रचंड बहुमताने चौकार मारण्याची संधी देऊन विजयी करावे असे आवाहन आ.काळे यांनी केले.

या पदवीधर संवाद कार्यक्रम मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार राहुल मोटे, भारतीय जनता पार्टी परंडा तालुका अध्यक्ष अरविंद रगेड,जिल्हा परिषद कृषी सभापती भाऊसाहेब खरसडे,संदीप पाटील, धनंजय हांडे,माजी मुख्याध्यापक बिभीषण रोडगे,राहुल बनसोडे, कोकाटे,भारतीय जनता पार्टी भूम तालुका अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, संस्थाचालक आर.डी. सुळ,बाबासाहेब वीर,हनुमंत पाटोळे, खैरे आबा, ॲड.रामराजे साळुंके,मनोज अंधारे, युवराज गटकळ,विजय बोराडे,आप्पासाहेब हूंबे, प्रा.डॉ.शिंदे,भोईटे, मुख्याध्यापिका श्रीमती शर्मिला पाटील,वाशीचे प्रा. समाधान माने, प्रा.गपाट, रणजीत गायकवाड, नानासाहेब चौधरी आदी सह पदवीधर मतदार तिन्ही तालुक्यातील पदवीधर संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top