तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीक्षेत्र तुळजापूर येथील प्रस्तावित 1856 कोटींच्या विकास आराखड्याबाबत प्रशासनाने वारंवार निवेदने, हरकती आणि आंदोलनांची दखल न घेतल्या ने आरोप करत श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने 15 ऑगस्ट 2026 पासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

पुजारी मंडळाने जिल्हाधिकारी, मंदिर संस्थान, पोलीस प्रशासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात विकास आराखड्याला विरोध नसून, श्री तुळजाभवानी मंदिराची धार्मिक परंपरा, पावित्र्य, स्थानिक हक्क आणि तुळजापूर शहराच्या सर्वसमावेशक विकासाचा योग्य विचार व्हावा, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी प्रशासनाकडे अनेकदा निवेदने व हरकती सादर करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी सांगितले.

 
Top