धाराशिव (प्रतिनिधी)- आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा 13 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रभारी मुख्याध्यापक सतीश शहाजी कुंभार यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. माहे जुलै 2026ची वेतनवाढ तात्काळ देण्यात यावी, दरमहा 1 तारखेला वेतन अदा करावे, वेतन विलंबामुळे बँक, पतसंस्था व गृहकर्जाच्या व्याजाचा भुर्दंड थांबवावा, तसेच पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी तात्काळ लागू करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये सेवा बजावणाऱ्या शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या हक्कांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी कुंभार यांनी केली.  

 
Top