धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या अटी शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना लाभ होईल असा निर्णय केल्यामुळे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भारतीय जनता पार्टी  प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रविंद्र चव्हाण भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आर्थिक चक्रातून बाहेर काढण्यासाठी 7.5 विद्युत पंपाचे  थकीत 48 हजार कोटी रुपये माफ करून शेतकऱ्यांची पाटी कोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तरीही या संदर्भात शेतकऱ्यांना अडचणी येत असतील तर त्या भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे   धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या  अडचणी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रामदास कोळगे (मो.7020855730) तसेच जिल्हाध्यक्ष संतोष बोबडे(मो.9850257777) यांच्यांशी संपर्क करून कळवाव्यात असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे.


 
Top