रुपामाता फाऊंडेशन, रुपामाता अर्बनकडून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आदर्श निर्माण करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे ही समाजाभिमुख सहकाराची परंपरा जपत रुपामाता फाऊंडेशन तसेच रुपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव, शाखा येडशी यांच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
रुपामाता उद्योग समूह व रुपामाता अर्बन/मल्टीस्टेट चे संस्थापक अॅड. व्यंकटराव गुंड पाटील तसेच कार्यकारी संचालक अॅड. अजित गुंड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला
यावेळी श्री. शामकुमार नलावडे (निवृत्त जिल्हा परिषद शिक्षक), श्री. गोपाळ इंगळे (निवृत्त रेल्वे पोलीस अधिकारी), श्री. उद्धव क्षीरसागर (निवृत्त अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया) तसेच श्री. ऋषिकेश मोरे (भारतीय लष्कर भरती) यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
शाखा व्यवस्थापक श्री. सोमेश्वर शिंदे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. तसेच कर्मचारी वर्गातील श्री. प्रमोद शिंदे, श्री. शुभम चौगुले व सौ. श्वेता जाधव यांनीही मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील गुणवंत, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी व्यक्तींचा गौरव करण्यासाठी रुपामाता अर्बन सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत असून, सामाजिक बांधिलकी जपणारी सहकारी संस्था म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.