भूम (प्रतिनिधी)-  स्पर्धेत टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि मोबाईलचा मर्यादित वापर करावा असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बागडे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रसंगी बोलताना केले.

रविवार दि . 14 जून 2026 रोजी कोष्टी समाज ट्रस्टच्या पुढाकारान 10 वी 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतला . यावेळी 38 विद्यार्थ्यांना 46 हजार रुपयाचे शैक्षणिक साहित्य वाटप केले. याच वेळी समाज बांधव महावितरण आदर्श गुणवंत कामगार म्हणून सन्मानित झालेले जयराज बाबर,  सतिश दाते विना अपघात कामगार म्हणून यांचाही सन्मान केला.

या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभासाठी अध्यक्ष म्हणून कोष्टी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बागडे होते. तर गुरुदेव शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर, ज्येष्ठ व्यापारी पांडुरंग वरवडे, सुभाष उपरे, प्रगतशील शेतकरी अभिमन्यू नवले, महावितरण अधिकारी गणेश तारळकर, माजी नगरसेविका वारे ताई, श्रीमती मीना बागडे, सौ प्रणिता वरवडे ,  सौ. स्वरा सागर बागडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी समाज कार्यकर्ते बी व्ही सदानंदे यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य स्कूल बॅग, रजिस्टर संच, पेन, कंपास व इतर अनेक प्रकारचे साहित्य वाटप केले.  त्याचबरोबर कै. डॉ. श्रीकांत फलके यांच्या स्मरणार्थ शैलेश फलके यांनी देखील रजिस्टर व पेनसेट प्रत्येकाला वाटत केले. यावेळी विद्यार्थी, पालक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नगरसेवक विठ्ठल बागडे, ट्रस्ट सचिव शंकर खामकर, योगेश शासलकर, प्रदीप कवडे, दत्ता वैद्य, केशव दाते, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top