भूम (प्रतिनिधी)- नाझिया इलाही खान याने धार्मिक भावना दुखावणाऱ्या कथित आक्षेपाई वक्तव्याबाबत तक्रार दाखल करण्यात यावी. अशी मागणी जमीयत ए उलेमा हिंदच्या वतीने करण्यात आली.
नाझिया इलाही खान याने सोशल मीडिया, इतर माध्यमातुन पैगंबर हजरत मुहम्मद (स.अ.) यांच्या शानबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले असुन तसेच हजरत आयशा (र.अ.) यांच्याबाबतही कथित आक्षेपार्ह टिपणी केली आहे. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ व अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे.
सदर प्रकरणाची चौकशी करून नाझिया इलाही खान यांच्याविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी व दाखल करण्याची कार्यवाही करावी. असे निवेदन जमीयत ए उलेमा यांच्या वतीने भुम पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. निवेदनावर साजिद शेख, मुफ्ती आयुब साहब, आसिफ जमादार, मुक्तदिर इनामदार, एजाज काझी, मुशीर शेख, युसुफ पिरजादे, पापा शेख, अबरार इनामदार, आखिलेश जमादार यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
