धाराशिव (प्रतिनिधी)- अतिवृष्टीमध्ये खरडून गेलेल्या जमिनीला 3 लाखाच्या पुढे मदत करतो म्हणणारे सरकार अद्यापही मदत केली नाही. कर्जमाफी बाबतही हेच धोरण आहे. मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली होती. या सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा करून कर्जमाफी केली नाही. विशेष म्हणजे माफी ही गुन्हेगाराला द्यावी लागते त्यामुळे शेतकरी विरोधी धोरण असलेले हे सरकार आहे अशी घणाघाती टिका शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये केली.
पुढे बोलताना उध्दव ठाकरे यांनी धाराशिव जिल्हा हा तुळजाभवानीचा जिल्हा आहे. काही नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांशी टक्कर दिली. त्या काळात शिवाजी महाराज जर निधीसाठी औरंगजेबकडे गेले असते तर आपण राहिलो असतो का ? असा सवाल शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी करून निधीसाठी गद्दारी करणाऱ्या सहा खासदारांवर कडाडून टिका केली.
ठाकरे यांनी अतिवृष्टीमधील व निवडणुकीच्या काळात आपण धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो. मोठ्या अभिमानाने आपण आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर हे खरे शिवसेनेचे वाघ असल्याचे सांगितले होते. परंतु ओमराजे यांच्या गद्दारीने वाघाचे कातडे पांघरूण लांडगा होता हे माहिती नव्हते. असे सांगून ठाकरे यांनी धाराशिव शहरात 500 कोटीचे प्लॉट असल्याची माहिती झाल्यामुळे ईडीची चौकशी ओमराजे यांच्या पतसंस्थेच्या मागे लागली होती. म्हणून त्याने गद्दारी केली. लोकसभा निवडणुकीच्यावेळेस भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील समाधान पाटील यांची मतदानादिवशी विरोधकांनी हत्या केली. त्याची चौकशी सुध्दा ओम याने न करता गद्दारीकरून शिवसेनेकांची हत्या करणाऱ्या गद्दाराच्या गटात जावून बसला. पण आपण समाधान पाटील यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, शंकरराव बोरकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदीसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
ओमराजे सोगांड्या- संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टिका करताना ओमराजे सोगांड्या असल्याचे सांगून स्वतःचा भाव वाढविण्यासाठी ते उशिरा गद्दारात सामिल झाल्याचे सांगितले.