धाराशिव (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेल्या अत्यंत संतापजनक प्रकरणात न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल रुपामाता फाऊंडेशन व विश्व हिंदू परिषद, धाराशिव यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या अमानुष घटनेनंतर रुपामाता फाऊंडेशन व विश्व हिंदू परिषद, धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देऊन आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा अर्थात फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडित कुटुंबाला न्याय व आवश्यक मदत मिळावी, तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली होती.

न्यायालयाने दिलेला हा निर्णय केवळ एका पीडितेला न्याय देणारा नसून महिला व बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा देणारा आहे. अशा गुन्ह्यांमध्ये जलद न्यायप्रक्रिया व कठोर शिक्षा हीच समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.

रुपामाता फाऊंडेशन व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, भविष्यातही महिला, बालकांच्या सुरक्षिततेसाठी व न्यायासाठी आमचा लढा कायम राहील.


 “नरसापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा ही पीडितेला न्याय देणारा आणि समाजात महिला व बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर संदेश देणारा ऐतिहासिक निर्णय आहे. या प्रकरणात रुपामाता फाऊंडेशन व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने आम्ही आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास अधिक दृढ झाला असून, अशा गुन्ह्यांमध्ये जलद न्याय व कठोर शिक्षा हीच समाजासाठी प्रभावी प्रतिबंधक ठरेल.“ 

ॲड. अजित गुंड पाटील

जिल्हा उपाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद, धाराशिव

सचिव, रुपामाता फाऊंडेशन, धाराशिव.

 
Top