भूम (प्रतिनिधी)- भूम, परंडा, वाशी या तीन तालुक्यातील महावितरणच्या उत्कृष्ट कामगारांचा गुणगौरव लातूर परिमंडळ कार्यालयाकडून करण्यात आला. यामध्ये भूम येथील जयराज दत्तात्रय बाबर यांचा प्रधान तंत्रज्ञ कामगार म्हणून सन्मान करण्यात आला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दिनांक 1 मे 2026 रोजी लातूर परिमंडळ अंतर्गत धाराशिव, बीड आणि लातूर या तीन जिल्ह्याचा समावेश असलेले प्रमुख कार्यालय लातूर येथे कार्यरत आहे. या कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट महावितरण कर्मचारी म्हणून गौरव केला जातो. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेतली जाते. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिलं जाते. याप्रमाणे भूम येथील जयराज दत्तात्रय बाबर यांचा प्रधान तंत्रज्ञ कामगार म्हणून वाशी तालुक्याकडून लातूर परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जयराज बाबर हे सध्या पारगाव येथील कार्यालयात प्रधान तंत्रज्ञ कामगार म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय भूम उपविभाग अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ कामगार म्हणून कार्यरत असलेले सोमनाथ लक्ष्मण मुळे तर परंडा उपविभाग अंतर्गत जवळा निजाम येथे कार्यरत असलेल्या स्मिता दत्तात्रय अंधारे यांचाही लातूर परिमंडळाकडून उत्कृष्ट कामगार म्हणून सन्मान करण्यात आला . यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उत्कृष्ठ प्रधान तंत्रज्ञ कामगार म्हणून जयराज दत्तात्रय बाबर यांचा सन्मान केल्याने भूम येथील श्री चौंडेश्वरी तरून एकता मंडळ व समस्त कोष्टी समाज बांधवांच्यावतीने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी कोष्टी समाज ट्रस्ट पदाधिकारी अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल बागडे, सचिव शंकर खामकर , नगरसेवक नवनाथ रोकडे , सदस्य शामराव वारे, अण्णा भागवत यांचा सहभाग होता.
