धाराशिव (प्रतिनिधी)-  दुकानातील कॉपर वायर चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे व पथक हे माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने पेट्रोलींग करत असताना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली. पोलीस ठाणे शिराढोण येथील आरोपी धनाजी बाबुराव पवार, रा. आळणी फाटा रेल्वेस्टेशन बाजूला ता.जि. धाराशिव, शिवाजी सर्जेराव काळे, रा. अंदोरा ह.मु. कन्हेरवारी पाटी ता. कळंब जि. धाराशिव यांनी मिळून गुन्हा केला आहे. त्यापैकी धनाजी बाबुराव पवार हा सध्या चोरीचा माल विक्री करण्यासाठी वाशी फाटा येथे थांबलेला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून धनाजी बाबुराव पवार यास ताब्यात घेवून त्याच्याकडे  चोरीचे गुन्ह्याबाबात अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांने सागिंतले मी व शिवाजी काळे यांनी सुमो क्र एमएच 14 सीएक्स 2377 ने शिराढोण येथील दुकानातील 200 ते 250 किलो कॉपर वायर चोरी केली आहे. आरोपी नामे धनाजी पवार याचे ताब्यातुन 17 किलो कॉपर वायर, टाटा सुमो जीप क्र. एमएच 14 सीएक्स 2377 असा एकुण 3 लाख 70 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

सदरची कामगिरी  पोलीस अधिक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोह अमोल चव्हाण, बळीराम शिंदे, अमोल निंबाळकर, राहुल नाईकवाडी, मपोहा शोभा बांगर, चालक पोलिस अंमलदार विनायक दहिहंडे  यांचे पथकाने केली आहे.

 
Top