धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी जनार्धन माधवराव वाघमारे (वय 71, रा. भीमनगर) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार, 24 एप्रिल रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
येथील कवयित्री तथाा शासकीय आयुर्वेदिक रूग्णालयातील परिसेविका भाग्यश्री वाघमारे-केसकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर रात्री 8 वाजता बौध्द स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाघमारे कुटुंबीयांचे सर्व नातेवाईक, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
