धाराशिव (प्रतिनिधी)-  अतालुक्यातील उपळा (मा.) येथे आयोजित विराट हिंदू संमेलनाला पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली. धार्मिक विधी, ग्रामदिंडी आणि हर घर भगवा उपक्रमांच्या माध्यमातून दिवसभर गावात एकात्मतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हे विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात उपळा, शिंगोली, वरुडा, कुमाळवाडी व खताळवाडी या पंचक्रोशीतील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग या वेळी दिसून आला. 

संमेलनाच्या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महादेवाला गावातील विविध समाज घटकांतील 29 जोडप्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या ग्रामदिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच पार्श्वभूमीवर हर घर भगवा अभियान राबवून गावातील अनेक घरांवर भगवा ध्वज फडकविण्यात आला. सायंकाळी झालेल्या मुख्य संमेलनात सामाजिक समरसता मंचाचे क्षेत्र समन्वयक निलेश गद्रे यांनी हिंदूंनी जातीभेद बाजूला ठेवून संघटित राहण्याची गरज अधोरेखित केली. 

तर वारकरी परंपरेतील प्रवचनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज एकंबीकर यांचेही पवचन झाले. या संमेलनाच्या आयोजनासाठी हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष महेश पडवळ, सचिव डॉ. कळमकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोगरे, कोषाध्यक्ष काका घोगरे, निखिल गाढवे, औदुंबर पडवळ, प्रसाद रणखांब, तसेच समितीतील 150 कार्यकर्त्यांसह श्रीसिद्धेश्वर हिंदू संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

 
Top