धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने टाटा मोटर्स या नामांकित कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन दि.25 मार्च 2026 रोजी सकाळी 09:00 वाजता करण्यात आलेले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी दिली.
या मुलाखतीसाठी दहावी पास व आयटीआय , बारावी पास व आयटीआय , डिप्लोमा, बी.ए., बी.कॉम , बी.एस्सी भाग तीन मध्ये शिकत असलेले विद्यार्थी आणि पदवी पूर्ण झालेले विद्यार्थी या परिसर मुलाखतीसाठी पात्र समजले जाऊ शकतात. सदर मुलाखतीसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/tPQMBq9vCS3gPCxbA या लिंक चा वापर करू शकता किंवा 9730961816 या क्रमांकावर संपर्क साधून प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ.मारुती लोंढे यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता. मुलाखतीसाठी धाराशिव जिल्ह्यातील व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी केले आहे.