तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस 12 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.

12 एप्रिलला श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेस निमित्ताने तेर येथे दिंडयांचे आगमन व मंदिरात सायंकाळी हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांचे किर्तन,13 एप्रिलला पहाटे आमदार राणाजगजितसिंह पाटील व मंदिर प्रशासक रूपाली कोरे यांच्या हस्ते महापूजा व दिंडयांची ग्रामप्रदक्षणा व सायंकाळी हभप बाळासाहेब महाराज देहूकर यांचे किर्तन, 14 एप्रिलला सायंकाळी हभप शंकर महाराज थोबडे यांचे किर्तन,15 एप्रिलला श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त फडक-यांचे मानाचे अभिषेक व सकाळी हभप दत्तात्रय महाराज अंबिरकर यांचे किर्तन व  सायंकाळी हभप कान्होबा महाराज देहुकर यांचें किर्तन.16 एप्रिलला पहाटे श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीची  छबिना मिरवणूक व श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे हजेरी किर्तन व मुख्य काल्याचा कार्यक्रम व दुपारी श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिर परिसरात कुस्त्यांची स्पर्धा होणार आहे. ही यात्रा अक्षय्यतृतीया पर्यंत चालणार आहे.याचा भाविक भक्त यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे व निरीक्षक अतुल नळणीकर यांनी केले आहे.


 
Top