तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून उभारण्यात आलेल्या नव्या शौचालय ब्लॉकचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे व्यवस्थापक संजय पेटकर, वरिष्ठ व्यवस्थापक धनंजय खामकर, हर्षला शिंदे व अशोक हुंडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समिती सदस्य धनंजय लोढे होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते नव्या शौचालय ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वच्छता व सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दृष्टीने ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक वातावरणाबरोबर आरोग्याच्या सोयी सुविधा व इतर सुख सुविधा उपलब्ध करून देणे ही महाविद्यालयाची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर या फंडाच्या साह्याने महाविद्यालयात विविध विकास कामे करण्यात आले.त्या विकास कामाचे आज लोकांकडून करण्यात आले.
प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाविद्यालयात मूलभूत सुविधा बळकट करणे ही काळाची गरज असून आरसीएफ सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कापणीच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देता आल्या आहेत. अध्यक्ष धनंजय लोढे यांनी आरसीएफचे विशेष आभार मानत, भविष्यातही अशा उपयुक्त प्रकल्पांद्वारे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. बी. क्षीरसागर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा .डॉ. बापूराव पवार यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
