कळंब (प्रतिनिधी)-“महामानवांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या विचारांचे केवळ स्मरण नव्हे, तर ते आचरणात आणणे होय. ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले, अशा संतांचे कार्य प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे,” असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष लखन गायकवाड यांनी केले.

लालबहादूर शास्त्री नगर, पुनर्वसन कळंब येथील महादेव मंदिरात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 150 वी जयंती सोमवारी (ता. 23) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सुनंदा कापसे, माजी नगराध्यक्ष बबन वाघमारे, तसेच शहरातील परिट समाजातील ज्येष्ठ नागरिक व नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सुनंदा कापसे यांनी गाडगे महाराजांच्या स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजजागृतीच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष लखन गायकवाड, नगरसेवक अतुल कवडे, शीतलकुमार चोंदे, आशा भवर, हर्षद अंबुरे, अर्चना मोरे, ज्योती हरकर, जमील खाटिक, रोहन पारख, वनमाला वाघमारे, अमर चाऊस, रुकसाना बागवान, शाला पवार, सागर मुंढे, योजना वाघमारे, स्वीकृत नगरसेवक संजय मुंदडा, प्रशांत लोमटे, माजी नगरसेविका आश्वीनी शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन ॲड. निलेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनंत वाघमारे यांनी मानले. यावेळी शहरातील विविध समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक ऐक्य व स्वच्छतेचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 
Top