धाराशिव (प्रतिनिधी)-  बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा च्या निवडणुकीमध्ये ॲड.अविनाश देशमुख यांची उमेदवारी मुंबई येथील बार कौन्सिल निवडणूक कार्यालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यामधून सर्वानुमते या निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अमोल वरुडकर यांच्या अध्यक्षतेखाली ठराव घेऊन अविनाश देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

 मुंबई येथील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करताना ॲड. अविनाश देशमुख, सोबत ॲड.रत्नदीप पाटील, ॲड.कमलाकर ताटे, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. अजिंक्य जगदाळे, ॲड.अनिकेत देशमुख उपस्थित होते.  धाराशिव जिल्ह्यातील सर्व विधीज्ञ मंडळींनी आपल्या धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी करण्यासाठी एकमताने प्रथम पसंतीचे मतदान देऊन येत्या 24 मार्चला होणाऱ्या मतदानातून सर्व मतदार वकील मंडळींनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे. 


 
Top