धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील इ.5 वी 6वी 7वी च्या नुकत्याच घेण्यात आलेल्या घटक चाचणी परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या तब्बल 108 विद्यार्थ्यांचा स्कुल बॅग, पॅड, पेन पुष्प प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गोरे, इ.7वी पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, इ.5 वी 6वी पर्यवेक्षक बालाजी गोरे, कलाध्यापक शेषनाथ वाघ, विज्ञान शिक्षक संजय वाघमारे, भारत गवळी यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर त्यांना अध्यापन करणारे शिक्षक, शिक्षिका  संगिता शिंदे,  एस.डी. गायकवाड, बीरगड, पी.पी. मैत्रे, दिपक केंगार, भरत नाडे, अमोल कस्तुरे आदि शिक्षक, शिक्षिकावृंद यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल संस्थाध्यक्ष सुधीर पाटील , सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील सीईओ आदित्य पाटील, एओ साहेबराव देशमुख यांनी अभिनंदन केले. बक्षीस वितरण समारंभ यशस्वीतेसाठी सहशिक्षक कृष्णा माळी , क्रीडाशिक्षक सुनिल मोहिते सेवक महादेव काळे, प्रशांत जाधव यांनी परिश्रम घेतले तर सुत्रसंचलन संगीतशिक्षक महेश पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.

 
Top