परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील कार्ला येथील तत्कालीन ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांनी संगनमत करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश वरपे यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यास, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मी येत्या 26 डिसेंबर 2025 रोजी पंचायत समिती परंडा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे वरपे यांनी निवेदन दिले आहे. 

या दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,शासनाच्या विविध रोजगार योजनांमध्ये अनियमितता आणि निधीचा गैरवापर झाल्याचा दावा वरपे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर यावे आणि शासनाच्या निधीचा दुरुपयोग थांबवावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या इशाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


 
Top