धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांना  12 डिसेंबर 2025 रोजी फेअरफील्ड बाय मॅरियट, पुणे येथे झालेल्या सिम्पलीलर्न युनिव्हर्सिटी लीडर्स फोरममध्ये उच्च शिक्षण नेते - 2025 पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि पुनर्कौशल्य यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण या पुरस्कारातून केले जाते. ही मान्यता त्यांचे मजबूत शैक्षणिक नेतृत्व आणि दर्जेदार शिक्षण आणि संस्थात्मक विकासासाठी वचनबद्धता दर्शवते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा मित्राचे उपाध्यक्ष तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अभिनंदन केले.  डॉ. विक्रमसिंह व्ही. माने हे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचे 40 हून अधिक शोधनिबंध प्रतिष्ठित जर्नल्स, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांची तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव  येथे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी म्हणून सात वर्षाहून अधिक काळ काम पहिले असून,त्यांनी कंपन्यांच्या 110 हून अधिक भरती कार्यक्रमांचे व जॉब फेअर आयोजन केले आहे. 

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ,तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,उद्योजक, कर्मचारी व आजी माझी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.


 
Top