कळंब (प्रतिनिधी)- विशाखापट्टणम येथे झालेल्या राष्ट्रीय इनलाईन हॉकी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र टिम मधुन  आराध्या प्रदिप धस हीची निवड होऊन विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय इनलाईन  स्पर्धेत खेळल्या बद्दल तीचा व पालकांचा कळंब येथील निवासस्थानी  दोस्ती ग्रुप च्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात  आल्या.

 या वेळी सतिश  टोणगे, संदीप भैय्या बाविकर, प्रताप मोरे , पार्श्वनाथ पाटील, प्रकाश धस , बाळासाहेब धस, पालक प्रदिप धस यांनी तिचा सत्कार केला व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  कुमारी आराध्य धस ही पिंपळगाव डोळा ता.कळंब जिल्हा धाराशिव येथील असुन , या गावातील ही एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या  यश बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top