परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील माणिकनगर, (शेळगाव) येथे सदगुरु संत माणिकबाबा यांचे समाधी सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह दि.28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंर 2025 या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला.
3 नोव्हेंबर 2025 रोजी सप्ताह सांगता अमृततुल्य किर्तन सोहळा काला दहिहंडी फोडून संपन्न झाला. महाप्रसादापुर्वी सद्गुरू माणिकबाबा संस्थान व समस्त गावकरी मंडळी माणिकनगर यांनी संस्थानासाठी भरीव मदत करणारे नि संस्थानात वृक्षसंवर्धन, सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.याच प्रसंगी शिक्षक वैजिनाथ सावंत यांचा संस्थान परिसरात वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन साठी सहकार्य व सामाजिक सेवभाव या कार्याचा गौरव म्हणून सेवाधारी ह.भ.प मंजीनाथ महाराज (माणिकबाबा संस्थान), ह.भ.प अभिमन्यू महाराज घाडगे (पंढरपूर) यांचे हस्ते विठ्ठल-रूक्मिणीची मुर्ती देवून महाप्रसाद रूपी सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती सतिश दैन, चेअरमन शिवाजी वाकळे, विजय महाराज परदेशी,सावता शेवाळे, हनुमंत हुरकुडे ,बंडु शेवाळे, धनंजय दैन, बळीराम वाघ, गणेश वाघमारे,किसन काळकुटे, बिभिषण शेवाळे,भानुमामा जाधव, गुलाबराव हाडगळे, लक्ष्मण काळे, सोमनाथ दैन, संदिप जगताप, भाऊ गांगर्डे, वसंत गांगर्डे, गंगुबाई शेवाळे आदि मान्यवर, समस्त गावकरी, महिला मंडळी तसेच पंचक्रोशीतील नागरिक भाविक भक्त उपस्थित होते.
