कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील श्री सदगुरु निरंजन रघुनाथ स्वामी मंदिर कसबा पेठ येथे सदगुरू निरंजन रघुनाथ  स्वामींचा जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यानिमित्त २९ ऑक्टोबर रोजी दत्तयाग व ३०  ऑक्टोबर रोजी श्री सदगुरु निरंजन रघुनाथ स्वामींच्या पादुकावर रुद्राभिषेक व महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला, सदगुरु. निरंजन रघुनाथ स्वामिनी अमृत अनुभव व ज्ञानेश्वरीवर टीका हे ग्रंथ लिहिले आहेत कळंबही स्वामींची जन्मभूमी आहे त्यांनी गिरणार पर्वतावर तपश्चर्य केली होती, नाशिक व मिरज वास्तव्य केले आहे कळंब येथील सदभक्त माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ यांनी स्वामींच्या कसबा पेठ येथील जन्मस्थळी स्वामींचे पादुका मंदिर निर्माण कार्य केले आहे,  मंदिर परिसराचा विकास करण्याचा संकल्प ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आला असून याचा एक भाग म्हणून  श्री सदगुरू निरंजन रघुनाथ स्वामी (पादुका मंदिर, कसबा, कळंब) मंदिर परिसरात दत्त उपासक कै.रंगनाथ किसनराव पोरे स्मृती प्रित्यर्थ श्री सद्गुरु निरंजन रघुनाथ स्वामी ध्यान व अध्यात्मिक ग्रंथ पठण (ध्यान ) मंडप (२१x२१) उभारणी करण्यात येत आहे यासाठीचे भूमीपूजन बुधवार दि.२९/१०/२०२५ रोजी दुपारी ४ वा. श्री. अशोक पोरे व

परिवारातर्फे करण्यात आले भूमिपुजनास  अन्नदाते बंडोपंत दशरथ , ह.भ.प .महादेव महाराज अडसूळ  करसन पटेल, प्रभाकर कुलकर्णी,विजयराव श्रोत्रे. 

श्रीराम कुलकर्णी, बसवराज राजमाने अरुण जोशी, रमाकांत कुलकर्णी,  संभाजी मोरे ,सुभाष हरदास, पुरुषोत्तम हुलसुलकर यांची उपस्थिती होती. जन्मोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित बाळ काका देशपांडे, भास्करराव खोसे, विजय श्रोत्रे, प्रभाकरराव कुलकर्णी, मनोज बाबळगांवकर , सुधीर देशमुख , राजाभाऊ कोळपे, ज्ञानदेव कदम,  यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विजय श्रोत्रे यांनी मंदिर परिसरात फरशी तसेच कंपाउंड वॉल यासाठी एक लाख रुपयाची देणगी जाहीर केली. त्यांच्या वतीने महाप्रसाद पंगत देण्यात आली  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कुलकर्णी, जगदीश गोरे, विलास खांडेकर, सुनील देशमुख यांनी परिश्रम घेतले.


 
Top