परंडा (प्रतिनिधी)- परंडा शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत खड्डया मध्ये साठलेल्या पाण्यामध्ये कागदाची होडी सोडून नगरपरिषद प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यातआला.

 ऐतिहासिक वारसा लाभलेलं परंडा शहर भुईकोट किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे राज्यातील त्याचबरोबर देशातील पर्यटक भेट देण्यासाठी परंडा शहरात येतात पण शहरातील रस्त्यांमुळे घोर निराशा होते शहरातील एसटी स्टँड ते बार्शी रोड तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते कुर्डुवाडी रोड या मुख्य रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत याच मार्गावर परंडा शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक खाजगी रुग्णालय शहराची मुख्य बाजारपेठ एसटी स्टँड साठी जाणारा मुख्य रस्ता असून कायम या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते रस्त्यांवर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गांवर कायम अपघात होतात शहरातील एक ही रस्ता सुस्थितीत नसून सर्व रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत नगरपरिषदेला वारंवार या रस्त्यावरील दुराअवस्थेबद्दल लक्ष वेधण्याचे काम केले असून प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे गेली कित्येक वर्ष प्रशासन शहरातील मुख्य रस्ते कायमस्वरूपी दर्जेदार बनवू शकले नाही मागील काही दिवसांमध्ये सातत्याने पाऊस होत असून पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साठल्यामुळे अनेक वेळा नागरिकांचे अपघात झाले आहेत डांबरी रस्त्यांवर मुरूम टाकणारी एकमेव परंडा नगरपरिषद असावी मुरूम टाकल्यामुळे संपूर्ण रस्ते चिखलमय खडतर झाले आहेत सर्वसामान्य जनतेस रस्त्याने चालणे देखील मुश्कील आहे या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगरपरिषद प्रशासनाचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परंडा शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पेपर पासून तयार करण्यात आलेल्या होडी सोडून निषेध नोंदविण्यात आला.

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के,जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे,परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे,मुक्तार हावरे,प्रफुल चौतमहाल,बाळासाहेब बोकेफोडे,लतीफ पठाण,बाबा बनसोडे,शिवाजी शिंदे,काशिनाथ वाघमारे,सतीश बनसोडे,अमीन पठाण,तसेच विराज बनसोडे,रूपाली बनसोडे,स्वराज बनसोडे,गिता बनसोडे,संध्या बनसोडे,पायल बनसोडे या लहान मुला मुलींनी देखील सहभाग नोंदवला. यावेळी कार्यकर्ते,पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.रविवार आठवडा बाजार असल्याने वाहतूक कोंडी झाल्यामुळे आंदोलन चर्चेचा विषय ठरला आहे.

 
Top