धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषदे धाराशिवसाठी नगराध्यक्षपद व नगरसेवक पदासाठी एकूण 23 जणांनी आपले उमेदवारी अर्ज शुक्रवार दि. 14 नोव्हेंबर रोजी दाखल केले आहे.
धाराशिव नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा चौरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नगरसेवक पदासाठी शेख नेहा बेगम अलीमोद्दीन यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वनमाला देडे, किरदत्त किशोर, अंकुश चौगुले, नारायण तुरूप, मनिषा बनसोडे, संगिता पेठे, सिध्दार्थ बनसोडे, सुनिल पंगुडवाले, सना शेख, सचिन पवार, वंदना पवार, प्रविण बनसोडे, सरस्वती खोचरे, शिवानी दंडनाईक, विलास लोंढे यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर संदीप इंगळे यांनी दोन तर भाग्यश्री खोचरे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रविवारी सुट्टी असून, शनिवारी मात्र उमेदवारी अर्ज भरणे चालू आहे.
.jpg)