मुरुम( प्रतिनिधी)- दि 16 सप्टेंबर रोजी उमरगा येथील भारत शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा करण्यात आला या रॅलीस हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या . ही रॅली महाविद्यालया पासून बस स्थानकापर्यंत घेण्यात आली रॅलीमध्ये समाज जागृती विषयी तसेच पर्यावरण, आरोग्य विषयी घोषणा देऊन रॅलीचे समापन महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले, डॉ विलास इंगळे ,डॉ पद्माकर पिटले ,कैप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले ,डॉ संतोष सुरवसे एनसीसी कैडेट्स ,प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते .

 
Top