मुरुम( प्रतिनीधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेरडवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वाकळे सर यांनी मांडले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या कार्याचे स्मरण केले.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतराव मंडले, उपाध्यक्ष रंजित भोकले, पोलीस पाटील काशिनाथ वासुदेव, शिवशंकर मंडले, रायाप्पा शिवपाटील, रंगुबाई वासुदेव, सपना मंडले, भाग्यश्री वासुदेव, पूजा मंडले यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक श्री. राठोड, श्री. सोमवंशी, श्री. कांबळे, श्रीमती कांबळे मॅडम, तसेच जमादार मॅडम आणि राम मंडले यांनी परिश्रम घेतले. मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top