भूम प्रतिनिधी- शासनाच्या प्रत्येक लोकाभिमुख योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचाव्या व छोटी मोठी प्रलंबित प्रकरणे मार्गे लागावेत या हेतूने तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनापर्यंत सेवा पंधरवडा दिन साजरा केला जाणार आहे . या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले आहे . याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांनी कार्यशाळेत बोलताना केले .

बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी भूम तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालयात राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांच्या प्रमुख उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला . या निमित्ताने कार्यकर्त्यांची एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली .

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोंबर 2025 रोजी पर्यंतच्या कालावधीत शासनाच्यावतीने महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे . प्रशासनाकडून या दरम्यान ग्रामीण रस्त्यांची नोंदणी,  भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देण्याचे नियोजन, जागा नाही त्यांना जागा उपलब्ध करून देणे , शेत रस्त्याची नोंदणी करणे, लोकसहभागातून कामे करणे, शेत रस्त्याची मजबूती करणे व जनता दरबाराचे आयोजन केले जाणार आहे,  

त्याच प्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील स्वच्छता मोहीम , रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विविध विषयावर प्रबोधन, आदिवासी पारधी समाज नगरीत प्रशासनाच्या सहकार्याने कॅम्प, गरजूसाठी बँक खाते उघडणे या कार्यक्रमा बरोबरच इतर महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन केले आहे . या दरम्यान कृषी विभागाच्यावतीने देखील शेती विषयावर प्रबोधन करून माहिती पत्रकाचे सर्वांना वाटप करण्यात आले .

या सर्व कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात तालुक्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त  , पदाधिकाऱ्यांची एक दिवसाची कार्यशाळा तालुका कार्यालयात घेण्यात आली . यावेळी  भाजप  राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर,  ता.अध्यक्ष संताजी सुपेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब विर, शहर सरचिटणीस आबासाहेब मस्कर,  ता. उपाध्यक्ष हेमंत देशमुख,  ता. अजाज मा अध्यक्ष प्रदीप साठे,  ता. प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर , शहर व्यापर आघाडी अध्यक्ष  चंद्रकांत गवळी,  शहर विधी आघाडी अध्यक्ष ऍड संजय शाळू,  सोशल मीडिया ता. अध्यक्ष सुजित वेदपाठक,  ता. पंचायत राज आघाडी अध्यक्ष सुब्राव शिंदे,  ता. महिला मोर्चा अध्यक्ष सौ. स्वाती तनपुरे, शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौं विद्याताई खामकर,  शहर युवा अध्यक्ष मुकुंद वाघमारे,  शहर ता.अल्पसंख्यांक अध्यक्ष महेबूब शेख, निलेश शेळके,  बन्सी काळे, महादेव शेंडगे,  शहर सहकार आघाडी अध्यक्ष ऋषींकेश खोले, सिद्धार्थ जाधव, रमेश टिपे, फौंजी प्रभाकर औताडे, सागर शिंदे,  महादेव पवार , सुरेश उपरे , दत्ता पवार,  भाऊसाहेब शिंदे,  राजू काळे कार्यालय प्रमुख  आकाश शेटे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top