तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील कृषीउत्पन्न बाजार समितीत या हंगामातील उडीद मुख येण्यास आरंभ झाला आहे. माञ सध्या सततच्या पावसामुळे बाजार समितीत येणारा उडीद व मुग शेतमाल ओला कलरविरहीत डँमेज येत असल्याने अशा शेतमालाची खरेदी करण्यास व्यापारी वर्गास अडचण येत आहे. खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. उडीद मुग हंगामा सुरु झाल्या पासुन पावसाने पुर्णता उघडीप दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उडीद, मुग शेतमाल शेतात भिजून खराब झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून गणल्या गेलेल्या पिकास माती मोल किंमत येत आहे. तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद या पिकास 3000 ते 5800 प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे. तर मुगाला 4000 ते 7200 प्रति क्विंटल भाव मिळत आहे. सततच्या पावसामुळे आवक दिवसेंदिवस कमी होत असून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांकडून मात्र दर्जेदार मालालाच भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी संघटनांकडून तातडीने शासनाने नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी होत आहे.