मुरूम (प्रतिनिधी)- मुरूम ते अक्कलकोट जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548ब ची दयनीय अवस्था झाली आहे, 2023 मध्ये या रस्त्याचे काम एका बड्या गुत्तेदारानी केले होते, आज रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, या मार्गावरील आलूर ते बोळेगाव या रस्त्यावरील 1 किलो मिटर रस्ता काम शेतकऱ्यांनी मावेजा साठी अडवला होता, मात्र त्यासंदर्भात निकाल लागून 6 महिने झाले अद्याप रस्ता काम झाला नाही, दि. 15 वार सोमवार रोजी बसव प्रतिष्ठान अध्यक्ष तथा समाजसेवक डॉ. रामलिंग पुराणे यांनी रस्त्यावर पाणी साचलेल्या खड्ड्यात बसून लाक्षणिक आंदोलन करून संबंधित गुत्तेदार व प्रशासनाला एक महिन्यात रस्त्या बाबतच्या समस्या सोडवावे अन्यथा बसव प्रतिष्ठान च्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मुरूम ते अक्कलकोट रस्त्यावर खड्डे व पाणी साचल्याने रहदारीस अडथळा. आलूर ते बोळेगाव रस्ता 2023 मध्ये शेतकऱ्यांनी मावेजा न मिळाल्याने आडवल्यामुळे अर्धवट सोडण्यात आले होते. दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावरुन प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.
उमरगा अक्कलकोट रस्ता भाविक व प्रवाशांना सोयीचा होता पण शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे परिसरातील नागरिकांनी याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.
प्रशासनाकडे वारंवार ग्रामपंचायत व बोळेगाव येथिल नागरीकांनी पाठपुरावा करून देखील याची दखल घेतली नाही. कोर्टातसुद्धा याचा निकाल लागला असुन अजुनपर्यंत याकडे दुर्लक्ष केले जात आहे.यावर्षी आलुर येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या रस्त्याची पार वाट लागली आहे,या रस्त्यावरील पुल फुटुन गेल्यामुळे रस्त्यावरुन पाणी वहात आहे,रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गाड्यांचे अपघात होत आहेत,तरीसुद्धा प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास भोगावा लागत आहे.लवकरात लवकर या रस्त्याची शासनदरबारी दखल घेऊन प्रवाशांची गैरसोय दुर करावी अशी मागणी नागरिकांतूनही होत आहे.
गुत्तेदार आणि प्रशासनानी जनाची नाहीतर नाही मनाची तरी लाज बाळगून रकडलेला रस्ता काम व ठीक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करावे अन्यथा त्याच ठिकाणी शड्डू ठोकून आंदोलने छेडण्यात येईल.
डॉ. रामलिंग पुराणे, अध्यक्ष, बसव प्रतिष्ठान