तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तुळजापूर शहराचे युवा नेते विनोद गंगणे व सचिन रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. 2 मधील अयोध्या नगर येथे जनतेच्या मागणीनुसार श्रीराम मंदिरासाठी वैशिष्ट्यपूर्ण सभागृहाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी नगरसेवक औदुंबर कदम, शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर, तसेच दिनेश क्षिरसागर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून विकासकामांना सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात नंदकुमार हाजगुडे, बापूसाहेब अमृतराव, राहुल कणे, शंकर जाधव, तुकाराम मुळे, बळीराम माने, नारायण मरळ सर, सुधीर रोचकरी, विजय नवले सर, ज्ञानेश्वर डांगे, सागर सूर्यवंशी, रघु गौड, विकास जाधव, गणेश चादरे, बंडू मुळे, प्रसाद डांगे, विकास भिरगें, दळवी काका, विकास डांगे, बालाजी पवार आदी मान्यवर सहभागी झाले होते. दरम्यान, प्रभागातील हे आठवड्यातील दुसरे सभागृह भूमिपूजन असून, या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.