उमरगा (प्रतिनिधी)- आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्यावतीने आरोग्य उपकेंद्र कलदेव निंबाळा येथे दि. 18 सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी, अशक्त परिवार अभियानाला सुरुवात करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन येणेगुर  केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक्षा गडदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. यावेळी शिवलिंग कारभारी, मुख्याध्यापक देविदास पावशेरे, उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी करुणा कुरील, आरोग्य सेवक अजिंक्य कांबळे ,आरोग्य सेविका राणी धावारे, आरोग्य मित्र आदेश जाधव, परिचारिका रुक्मिणी कुलकर्णी आशा कार्यकर्त्या संगीता लाळे, सुनीता पाटील, सुनीता सूर्यवंशी, मीरा पांचाळ य़ांच्यासह रुग्ण उपस्थित होते.

कलदेव निंबाळा आरोग्य उपकेंद्र अंतर्गत कलदेव निंबाळा,रामपूर, समुद्राळ या गावातील महिलांच्या विविध तपासणी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यानया शिबिरात होणार आहेत. पहिल्याच दिवशी 214 महिला, युवतींना तपासणी व आरोग्य सेवा  देण्यात आल्या. महिलांच्या सर्व तपासण्या व आरोग्य सेवा देत निरोगी जीवनशैली आणि पोषण होण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभागही घेण्यात येत आहे. यात क्षयरोग, रक्तदाब, मधुमेह, दंतरोग, मुख स्तन, गर्भाशय आदी कर्करोग, हिमोग्लोबीन, प्रसुती पूर्व तपासणी करण्यांत आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते देविदास पावशेरे यांनी आरोग्य उपकेंद्र कर्मचारी व आरोग्य विभागाचे आभार मानले.

 
Top