वाशी (प्रतिनिधी)-  वाशी शहर व वाशी तालुक्यामध्ये गुरुवारी रात्री व शुक्रवारी दि.19 सप्टेंबर रोजी पहाटे पावसाने धुमाकूळ घातला. गावालगतचे सर्व ओढे, नाले, नदी, तलाव, तुडुंब भरून वाहिले आहेत.

शहराला जोडणाऱ्या सर्वच पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावाचा संपर्क सकाळी अकरा वाजेपर्यंत तुटला होता. वाशी तालुक्यातील पहाटे मुसळधार पाऊस पडल्याने ओढे, नदी,नाले गटारी पाणी तुंबळ वाहत होते. अति पावसामुळे ओढे,नाले, नदी, गटारी वाहू लागले. परंतु फुरसाण पूल जाम झाले आणि वाहतुकीवर परिणाम झाला.

 वाशी शहरांमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्याने नदीकाठच्या घरामध्ये  पाणी घुसले आहे. तसेच वाशी शहरांमध्ये तळघरातील दुकाने,दवाखाना,मेडिकल स्टोअर्स, फर्निचर अनेक दुकानांमध्ये गुडघ्या इतके पाणी साचल्यामुळे  व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. पहाटे शेतकरी शेतामध्ये जात असताना पुलावरचे पाणी वाढल्याने शेतकऱ्यांना जाता येत नव्हते. इकडे तिकडेही जाता येत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. वाशी तालुक्यांमध्ये पहाटेच्या वेळी दोन तासांमध्ये 220  मी.मिटर पाऊस झाला आहे.वाशी मध्ये 23 वर्षानंतर एवढा पाऊस झाला आहे. मात्र सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे गावातील नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष  सुरेश बाप्पा कवडे आणि गावातील काही  नागरिकांनी व तालुका तहसीलदार  प्रकाश म्हेत्रे  यांच्याकडून गावातील पुलाची ,दुकान, मेडिकल, दवाखाना,व पडझड  घरांची पडझड झालेली  स्वतःहून पाहणी करण्यात आली.

 
Top