कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष (२०२५-२६) भाषा वाडमय मंडळाची स्थापना करण्यात आली.
प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक ॲड. विजयकुमार कस्तुरे," महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. नवोदितांनी मनापासून लिहिण्याची गरज असून त्यांनी सामाजिक जडणघडणीत योगदान दिले, असून भाषा ही माणसांना जोडणारी असली पाहिजे.
"सुंदर अमुची माय मराठी मायबोली जगात साजली" याप्रमाणे मराठी ही सौंदर्याने नटली अवघ्या विश्वामध्ये गाजली जगातल्या 'मी तू छी तू' सर्वात या त्यांच्या लघुअक्षरी कवितेमध्ये मानवी जीवनकाव्य सामावलेले दिसते असे स्पष्ट करून, त्या तरुच्या सावलीला चल सखे बोलू जराही नातेसंबंधावरील भावनिक कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. आशयाची रचना सादर करून स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले, खरे म्हणजे स्त्री आज सर्वच क्षेत्रात जन्माचे असलेला महिलांचा सहभाग हे त्यांच्या आधुनिक काळाची नांदी ठरावी, असे कवितेतून महत्व पटवून दिले आहे. महाविद्यालयाच्या वाडमय मंडळातून विद्यार्थ्यांनी लेखन करीत राहिले पाहिजे, या भविष्यातील दर्जेदार साहित्यिक निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन ॲड.विजयकुमार कस्तुरे (ज्येष्ठ साहित्यिक, चिखली जि. बुलढाणा) यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि संस्थेचे संस्थापक मोहेकर गुरुजींच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. वाडमय मंडळाचे उद्घाटक म्हणून उपस्थित प्रा.डॉ.संजय कांबळे (संस्थेचे संचालक तथा अधिसभा सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर) म्हणाले, "समाजजीवनात सर्व भाषा समान दर्जाच्या असून त्यात ही कोणतीही एक भाषा श्रेष्ठ असते, असे नाही. दैनंदिन सामाजिक व्यवहारासाठी हिंदी, मराठी अथवा इंग्रजी असो ती उपयुक्त ठरते. परंतु ती भाषा माणसा माणसातील संवाद जोपासणारी असली पाहिजे. लेखकांनी आपल्या भावना साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करणे अपेक्षित असते."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.दादाराव गुंडरे यांनी सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रा.नितीन अंकुशराव यांनी मानले. सदर कार्यक्रम डॉ.अशोकराव मोहेकर (सचिव, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा) यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये उपप्राचार्य डॉ.के.डी.जाधव, जयंत भोसले तर प्राचार्य डॉ.हेमंत भगवान उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या "शब्दफुलोरा" भित्तिपत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ.डी.एन.चिंते, प्रा.डॉ.बी.एस. सावंत, प्रा.जे.एच.काजी, प्रा.डॉ.एन.एम.अदाटे, प्रा.डॉ.बालाजी वाघमारे, प्रा.डॉ.के.डब्लू.पावडे, प्रा.डॉ.नामानंद साठे, प्रा.डॉ.अक्षय शिंदे, प्रा.डॉ.मीनाक्षी जाधव, प्रा.रोहिणी लोहकरे, प्रा. डॉ. वर्षा सरवदे, प्रा.राम दळवे, प्रा.सूरज गपाट, प्रा.शाहरुख शेख, प्रा.डॉ.समाधान चंदनशिवे, प्रा. तांबोळी, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अधीक्षक हनुमंत जाधव, इकबाल शेख, संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.