कळंब (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजीवन शिक्षण व विस्तार विभाग याचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी उद्घाटक प्रा.डॉ.संजय कांबळे अधिसभा सदस्य बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.अहिल्या बरुरे ( यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. सदर विस्तार केंद्राच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी उद्घाटनपर बोलताना डॉ.संजय कांबळे म्हणाले ,"शिक्षण हे फक्त नोकरीसाठी न घेता व्यवहारापयोगी कौशल्यासाठी घ्यावे. त्यातून आत्मसात करून स्वावलंबी व्हावे आणि एक चांगला नागरिक म्हणून जीवन जगावे असा संदेश दिला."
यानिमित्ताने प्रमुख मार्गदर्शक असलेल्या प्रा.डॉ. अहिल्या बरुरे म्हणाल्या, "आजच्या स्पर्धेत अनेक क्षेत्रात विद्यार्थी हे यशस्वी होत आहेत. विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी यातील वेगवेगळ्या उपक्रमांचा लाभ घ्यावा. हा विभाग म्हणजे समाज आणि विद्यापीठ यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असतो. या केंद्राचे वर्षभर विविध कोर्सेस सुद्धा चालवण्यात येतात. व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्याकडे विवेकबुद्धी आली पाहिजे, संवेदनशील समाजाची निर्मिती झाली पाहिजे, तसेच समाजाची वीण घट्ट करण्याची करण्याची भूमिका या विभागामार्फत पार पडली जाते. विद्यार्थी कृतिशील बनावे असाही संदेश यानिमित्ताने दिला.
यावेळी उपप्राचार्य डॉ. के.डी.जाधव, डॉ.नामानंद साठे, डॉ.बालाजी बाबर, प्रा.शाहरुख शेख,डॉ.विश्वजित मस्के,प्रा.नितीन अंकुशराव,डॉ.ईश्वर राठोड, डॉ.ए.आर.मुखेडकर, डॉ.श्रीकांत भोसले या कार्यक्रमासाठी अधीक्षक श्री हनुमंत जाधव,अर्जुन वाघमारे आणि अरविंद शिंदे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.दादाराव गुंडरे यांनी सूत्रसंचालन डॉ.वर्षा सरवदे तर आभारप्रदर्शन प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वंयसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.