धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते,सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांनी वरील प्रतिपादन केले.

प्रारंभी डॉ देशमुख यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ,थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना अभिवादन करण्यात आले, ध्वजारोहण कार्यक्रमानंतर महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ मदनसिंग गोलवाल यांच्या पुढाकारातून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते,ग्रंथ प्रदर्शनामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामवर आधारित ग्रंथ वाचकांसाठी ठेवण्यात आले होते,सदर ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ देशमुख यांनी वरील प्रतिपादन केले, पुढे ते म्हणाले की आपल्या प्रदेशाचा, आपल्या मातिचा इतिहास आपणांस माहीत असणे आवश्यक आहे,13 सप्टेंबर 1948 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार मराठवाड्यात निजामांविरुध सैनिक कारवाई झाली होती केवळ 3 दिवसांत हैदराबाद संस्थानातील सर्व महत्वाची केंद्र भारतीय सैन्याच्या ताब्यात आली होती,17 सप्टेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील 8 जिल्हे स्वतंत्र भारतात सामिल झाली होती,या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ ,अनंत भालेराव यांच्या सह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लोकांचा मोठा सहभाग होता आणि हा इतिहास आजच्या तरुणांना जाणून घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ देशमुख यांनी व्यक्त केले.या प्रसंगी ग्रंथपाल डॉ मदनसिंग गोलवाल यांच्यासह प्रा डॉ बालाजी गुंड, डॉ केशव क्षीरसागर,प्रा सचिन चव्हाण,प्रा बबन सुर्यवंशी,  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ मंगेश भोसले यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top